मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवास्थान म्हणजेच ‘कृष्णकुंज’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. दरम्यान, आता लवकरच राज ठाकरे कृष्णकुंज सोडणार आहे. राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणार आहे. राज ठाकरे यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा, मातोश्री आणि सिल्वर ओकचं जे स्थान आहे, तेच महत्त्व कृष्ण कुंजच आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यापासून ते कलाकार, सेलिब्रिटी, सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने कृष्ण कुंजवर येतात. या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही, असा त्यांना विश्वास असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कृष्ण कुंजचं एक वेगळं स्थान आहे. कृष्ण कुंज हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे. राज ठाकरे माहित असणाऱ्यांना कृष्ण कुंज कुठे आहे, हे ठाऊक नाही, असं होणार नाही. याच कृष्ण कुंज मधून राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेसापासून ते शिवसेना सोडण्यापर्यतचे राजकीय कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. हेच कृष्ण कुंज निवासस्थान राज ठाकरे उद्या सोडणार आहेत. कृष्ण कुंजमधला त्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज ठाकरे कृष्ण कुंज सोडणार असले, तरी ते शिवाजी पार्कमध्येच राहणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन घरी शिफ्ट होत आहेत. राज ठाकरे कृष्णकुंज या इमारतीवरील तिसऱ्या माळ्या वर राहत होते. याच इमारतीत पहिल्या माळ्यावर आहे त्यांचे घर होतं. मात्र आता शेजारीच नवा बंगला राज ठाकरे यांनी बांधला आहे. दिवाळीच्या पाडव्याला ते नव्या घरी शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. हे नवं घर राज ठाकरे यांनी मोठ्या आनंदान सजवलं आहे. राज ठाकरे यांचा हा नवा बंगला पाच मजल्याचा आहे. या बंगल्याचे इंटेरियर राज ठाकरे यांनी स्वतः डिझाइन केले आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरे यांनी स्वतः निवडलेल्या आहेत. या बंगल्याच्या डिझाईनसाठीही राज यांनी स्वतः लक्ष दिलं होतं.