जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्वीट करत माहिती दिली आहे. गेहलोत त्यांच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर गेहलोत आयसोलेशनमध्ये गेले होते.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोना टेस्ट केल्यानंतर आज माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कुठल्याही प्रकारचे लक्षण नाहीत आणि मी ठीक आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत मी आयसोलेशनमध्ये राहूनच काम सुरू ठेवणार आहे.’
















