अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कोविड केअर सेंटरसाठी राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या सौजन्याने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अमळनेर शहर व तालुक्यात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक रूप घेत आहे. खाजगी हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेत. रुग्णांची होणारी हेळसांड पाहून प्रशासनाने सामाजिक, राजकीय संस्था व व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले होते. यालाच साद देत राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या मदतीने अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी राजमुद्रा फाऊंडेशनचे पदाधिकारी किरण पाटील, अक्षय चव्हाण, कमलेश पाटील, सुमित पाटील, विशाल पाटील, सारंग लोहार, अक्षय पाटील, निखिल सूर्यवंशी, संजय चौधरी उपस्थित होते.