अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या जिल्हा ग्रामीणच्या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अमळनेरचे राकेश पाटील यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या कार्यकारणीत सागर भारंबे (रावेर), गिरीश वराळे (शिरसोली), मिलिंद वाणी (चोपडा), योगेश महाजन(धरणगाव) यांच्या जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीणतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. राकेश पाटील व चारही सहसंयोजक यांनी या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आंदोलने असो अथवा निवडणूक काळातील कामे त्यांनी यशस्वीपणे पूर्णत्वास पार पारपाडली आहेत. सदर निवड ही त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दिलेली पावतीच मानली जात आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे(राजुमामा) यांनी दिलेली आहे. यावेळी नियुक्ती पत्र माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, रक्षाताई खडसे, माजी आमदार स्मिताताई वाघ हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वकांक्षी संकल्पना देशात सुरू केला आहे. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या गेल्या आहेत. त्यांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य जळगाव जिल्ह्यात वाढीस लागण्यासाठी ही निवड केली गेली आहे.
















