धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी करण्यात आले होते. देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सैन्यदनातील वीर जवानांसह पोलिसांना विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
सर्वप्रथम शाळेच्या मुलींनी मुलांना औक्षवान करून राखी बांधली तर मुलांनी त्यांना गोड भेट वस्तू दिल्या. त्यानंतर सर्व महिला शिक्षकांनी आणि विद्यार्थिनींनी पोलीस आणि भारतीय जवानांना औक्षवान केले आणि राखी बांधली आणि त्यांनी सर्व विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या.
आपल्या कुटुंबापासून अनेक दिवस राहणारे जवान आणि सणांच्या काळात बंदोबस्त करणारे पोलीस विद्यार्थ्यांनी राखी बांधल्यामुळे भारावून गेले होते. या उत्सवात मुकेश न्हावी, मधुकर महाजन आणि संतोष धनगर हे मिल्ट्रीचे जवान उपस्थित होते. या उत्सवाचे नियोजन शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार यांनी केले. या उत्सवाला सिमरन खाटीक, अनिता, छाया पाटील, एकता राणी, शीला चौधरी, वेदांति गुजराती तिलोचना बडगुजर, मृणाली सोनवणे, वैशाली जैन, दिव्या पाटील, जान्हवी महाजन, माधुरी पाटील राखी भागवत ह्या उपस्थित होत्या.