मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण आज दसरा मेळाव्यास तब्येतीच्या कारणास्तव येत नसल्याचं रामदास कदम यांनी कळवलं आहे.
शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी घेतला आहे. मागील तीन महिन्यांपासून रामदास कदम आजारी आहेत. रामदास कदमांवर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरी दोन महिने उपचार सुरू होते. संसर्ग वाढू नये, यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.
















