पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील एका २० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील वस्तीत दि १ रोजी एक अनोळखी व्यक्ती २० वर्षीय विवाहितेच्या घराला दार नसल्याने घरात घुसून विवाहीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एका अनोळखी विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहेत.