पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विवाहितेचा घरात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात दि. २१ रोजीच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय विवाहितेच्या घराला दरवाजा नसल्याची संधी साधत गणेश बाबुलाल वाघ हा विवाहितेच्या घरात घुसून विवाहितेला लज्जा उत्पन होईल, अशी वागणूक करीत विवाहितेचा विनयभंग केला. हा प्रकार रोखण्यासाठी पिडीत विवाहितेचा पती व सासू यांनी जाब विचारत असताना त्यांना सुद्धा संशयित आरोपी गणेश वाघ याने शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी पिडीत विवाहितेने पारोळा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी गणेश वाघ याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जयवंत पाटील हे करीत आहेत.