फैजपूर (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून परिसरातील एका गावातील तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर तीचा तब्बल तीन वेळेस जबरदस्ती गर्भपात देखील करण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ३२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामचंद्र संघरत्न वाघादे याने २०१७-१८ ते आतापर्यंत पिडीतेसोबत प्रेम संबंध प्रस्तापित करून मी तुझ्याशी लग्न करील असे आमिष देवून तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मर्जीविरुद्ध शारिरिक संबंध प्रस्थापित केलेत. यातून पिडीता तिन वेळेस गर्भवती राहिली. यावेळी रामचंद्र वाघादे याने पिडीतेच्या मर्जीविरुध्द तिला आयर्वेदिक गोळ्या देवून र्भपात केला. याप्रकरणी फैजपूर पोलीसा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. एम.जे. शेख हे करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर रामचंद्र वाघादे याने याने फैजपूर पोलीस स्टेशनचे लॉकअपमध्ये कोठून तरी धारदार ब्लेड घेऊन त्याच्या डाव्या हातावर स्वतःहून मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळून आला होता. याप्रकरणी पो.ना. बाळू भोई यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामचंद्र वाघादेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत.
















