चाळीसगाव (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसच्या औचित्याने चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत क्रीडा विभाग, तालुका प्रशासन यांच्या वतीने ‘एकता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी या एकता दौड मध्ये सहभागी होऊन क्रीडापटूंचा उत्साह वाढवला. तसेच यानिमित्ताने राष्ट्रीय एकतेची सामूहिक शपथ घेतली.
यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, क्रीडा शिक्षक अजय देशमुख, शरद सूर्यवंशी सर, राहुल साळुंखे, योगेश साळुंखे, संजय देशमुख, प्रशांत पाटील, आनंदा पवार, चव्हाण सर, जहीर सर, जावळे सर, शिनकर सर, पवार सर, साठे सर, तुषार निकम सर, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, कुस्तीगीर संघाचे सुनील देशमुख, अक्षय राजपूत, गोरख सुर्यवंशी, निंबाळकर सर, योगेश शिंदे सर आदी उपस्थित होते.
तसेच लुधियाना, पंजाब येथे होत असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ चाळीसगाव येथून रवाना होत आहे, सदर संघात चाळीसगाव येथील ५ स्पर्धक खेळाडू सहभागी होत असून त्यांची देखील आमदार चव्हाण यांनी भेट घेऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
















