रावेर (प्रतिनिधी) अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीचा सावत्र बापाने गळा आवळून खून केला तर या खुनात मुलीख्या सख्ख्या आईने देखील साथ दिल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आकांशा घेटे (वय 3) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे तर माधुरी घेटे (26) व अजय घेटे (30) अशी अटकेतील सख्या आई व सावत्र बापाची नावे आहेत. खुनाचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गळा आवळून केला खून
बेलसवाडी, ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी 2017 मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडीला आली व तिने ेावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसांपूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून दोन्ही मुले रावेरातील अजयकडे राहत होती. 31 मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली. ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पती-पत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला.
मुलाच्या कबुली जवाबानंतर फुटले खुनाचे बिंग
माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला हा प्रकार कळाल्यानंतर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर त्याने बहिणीला दुसर्या पप्पाने मारले असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान खूनाचे कारण समजू शकले नाही. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ करीत आहेत.