जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुने जळगाव परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र रामदास तिवाणे (वय ५०) यांचे शनिवार दि.२९ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. ३० रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरून निघणार आहे. मयत रविंद्र तिवाणे यांच्या २ भाऊ, २ मुले, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मिलन पान हाऊसचे संचालक लक्ष्मण तिवाणे यांचे लहान बंधू होते.