जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते पत्रकार चेतन वाणी यांचे वडील होते. अंत्यविधी आज दुपारी ५.३० वाजता राहत्या घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.