TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ ; जितेंद्र आव्हाडांची कविता व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर केली आहे. या कवितेमध्ये आव्हाड यांनी भाजपने महाराष्ट्रातील संचारबंदीला विरोध केल्यामुळे भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. या कवितेचं शीर्षक ‘खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ असं देऊन आव्हाड यांनी ही कविता फेसबुकवर शेअर करताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. मात्र, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतून खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही.
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले .
निर्णय घेताना घेतले
विश्वासात.
विरोधकांचे त्यामुळेच
फावले..
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले.
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले.
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या.
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको.
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव..
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय.
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय.
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय.
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ..
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना क्लीन चिट देता आली.
ना खोटी आकडे वारी देता आली.
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली.
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय.
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय.
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे.
विरोधकांचे खरंच राईट आहे.
खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

अशा आशयाची कविता जितेंद्र आव्हाड यांनी शेअर करताच ती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी मात्र या कवितेकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. कारण, यामध्ये आव्हाडांनी आपल्या विशेष शैलित विरोधकांवर टीका केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

आता बँकेतील पैसेही मिळणार थेट घरपोच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात विद्यार्थ्यांनी साकारली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची भूमिका !

January 12, 2023

Horoscope: राशीभविष्य, सोमवार १८ एप्रिल २०२२ !

April 18, 2022

अमळनेर जवळील एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून !

December 6, 2024

राज्यस्तरीय ऑनलाईन ‘काव्य ‘ स्पर्धेत परमेश्वर रोकडे द्वितीय

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group