जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०३, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०५, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०४, यावल-२१, एरंडोल-०३, जामनेर-०२, रावेर-०३, पारोळा-०३, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ७८५ पर्यंत पोहचली असून १३७ हजार ६३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १५८३ रुग्ण सध्या उपचार घेताय.