नशिराबाद (प्रतिनिधी) येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला) मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात महिलांनी पुढाकार घेतला असून दहा दिवस मंडळाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहे तर या उत्सवादरम्यान शनिवारी मातेच्या समोर सप्तशृंगीच्या पाठाच्या पठणाचा धार्मिक कार्यक्रम मंडळाच्यावतीने घेण्यात आला.
या नवरात्र उत्सवात नशिराबाद गावात प्रथमच अजिंक्य (महिला) मंडळ स्थापन करून यंदा दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात दहा दिवसात अजिंक्य महिला मंडळाचा कारभार महिला भगिनी सांभाळणार असून या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तर महिलाच मातेची गरबा, दांडिया खेळत स्थापना व विसर्जन ही करणार आहे.
सप्तशृंगीच्या पाठाचे पठण
राज्य शासनाच्या नियमानुसार विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शिबिर घेण्याचे नियमावली जाहीर झाली आहे. याच माध्यमातून अजिंक्य (महिला) दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने शनिवारी परिसरातील महिलांना बोलवून दुर्गा मातेच्या समोर सप्तशृंगीच्या पाठाचे पठण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद गावातील अँड. सुवर्णा बर्हाटे यांच्या हस्ते दुर्गा मातेची पूजा अर्चा करून सप्तशृंगीच्या पाठाच्या पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजिंक्य महिला मंडळाच्या शारदा भावसार, सुनीता शिवरामे, पुष्पा नांदुरकर, साधना पाटील,सिमा भावसार आदींसह पदाधिकारी उपस्थित होत्या.