पुणे (वृत्तसंस्था) खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती होत आहे. संचालक पदासाठी एकूण १८ तर उपसंचालक पदासाठी १६ जागा आहेत. आवेदनाची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२० असून संचालक पदासाठी वयोमर्यादा कमाल ५० वर्षे तर उपसंचालक पदासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे इतकी आहे.
सविस्तर माहिती –
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे 18)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव
पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे 16)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव
वयोमर्यादा :- अ) संचालक पदासाठी कमाल 50वर्षे ब) उपसंचालक पदासाठी कमाल 40 वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख : 15 डिसेंबर 2020