कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, अशी मागणी एरंडोल तालुका एआयएमआयएम च्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
एआयएमआयएम च्यावतीने दि. १८ जुन रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे त्यात २५% भाव कमी करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी एरंडोल तालुकाध्यक्ष शाकीर, उपाध्यक्ष मोहसीन रजा, नगरसेवक असलम पिंजारी, इरफान भाई, आमीन भाई, असलम भाई, मोहसीन खान आदी उपस्थित होते