वरणगाव (प्रतिनिधी) येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी एक नवीन सामाजिक उपक्रम राबवत आहेत.”रुग्णसेवा सोबत धार्मिक कार्य” म्हणून वासुदेव नेत्रालयतर्फे नेत्र रुग्ण तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
अनेक वर्षांपासून रामभक्त वाट पाहात असलेला क्षण अखेर २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन पूर्ण झाला. त्यासाठीच्य वरणगाव येथील वासुदेव नेत्रालाय द्वारे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना तपासणी सोबत अयोध्या येथील निमंत्रण पत्रिकांचं वाटप सुरु झाले होते. आता वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी एक नवीन सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
“रुग्ण सेवा सोबत धार्मिक कार्य” म्हणून वासुदेव नेत्रालय तर्फे नेत्र रुग्ण तपासणी शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे शास्त्रोत्र पद्धतीने डोळे तपासणी फक्त 150 रुपयात असून त्यातील प्रत्येक रुग्णांमगील रुपये 50 हे अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरासाठी देणगी म्हणून देण्यात येणार आहेत.जळगाव जिल्ह्यात असा उपक्रम प्रथमच राबविला जात असून वासुदेव नेत्रालयाच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. २१ जानेवारी ते ३१ जानेवारी याकालावधीत शिबिर असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे.