जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रेमडेसिव्हर इंजेक्शन कमी किमतीत सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देणारी, एचआरसीटी फक्त १८०० व कोविड रक्त तपासणी फक्त १३०० रुपये करून देणारी सामाजिक संघटना म्हणजे जळगाव जिल्हा मानियार बिरादरी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जात आहे. तसेच विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परविन मेडिकलच्या माध्यमाने मानियार बिरादरीला रेमडेसिव्हरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मनियार बिरादरीने केली आहे.
जिल्हादंडाधिकारी यांनी पुरवठा करावा
रेमडेसिव्हरचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याने ३ एप्रिल पासून जिल्हाधिकारी यांनी डिस्ट्रीब्यूटर कडून सरकारी, निम सरकारी व कोवीड केअर सेंटरला रेमडेसिव्हर इंजेक्शन देणे बाबत ड्रग इंस्पेक्टरमार्फत पुरवठा सुरू केलेला आहे. त्यामुळे मानियार बिरादरीला शनिवारी इंजेक्शन मिळालेले नाही. वास्तविक पाहता जळगाव जिल्ह्यात जेव्हा चार ते पाच हजार रुपयांमध्ये इंजेक्शन विकले जात होते. तेव्हा बिरादरीने ११०० रुपयात उपलब्ध करून दिले तर मागील चार दिवसापासून तेच इंजेक्शन फक्त ७४९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी के परविन मेडिकलच्या माध्यमाने मानियार बिरादरीला रेमडेसिव्हरचा पुरवठा करण्यात यावा, अशी लेखी मागणी केलेली आहे.
गरीब रुग्णास मोफत रेमडेसिव्हर
सामाजिक बांधिलकीच्या अधीन राहून गरीब रुग्णांना मोफत रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव पॅटर्न राबवणारी ही एकमेव बिरादरी आहे. त्यामुळे गरिबांना सुद्धा याचा फायदा होत असल्याने त्यांना पुरवठा करण्यात यावा, अशी जळगावकरांनी सुद्धा मागणी केलेली आहे. सदर आशयाचे पत्र जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांना दिले असून त्याची प्रत ड्रग इन्स्पेक्टर माणिकराव यांना सुद्धा दिलेली आहे.