नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारने कांद्याची निर्यात रोखली आहे. तरीही कांद्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने कांद्याची आयात वाढविण्यासाठी आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत.
15 डिसेंबरपर्यंत शिथील केलेल्या नियमांची अंमलबजावणी चालू राहणार आहे. दरम्यान केंद्र सरकार स्वतःकडील साठ्यातून बऱ्याच प्रमाणात कांदा उपलब्ध करणार आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. लवकरच खरीपाचा 37 लाख टन कांदा बाजारपेठेत येणार आहे. त्यामुळे किमतीकमी होण्यास मदत होणार आहे.
ज्या आयातदारांनी कांद्याची ऑर्डर दिली आहे. ती आयात वेगात व्हावी आणि बंदरातून कांदा देशभरात लवकर उपलब्ध व्हावा, याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.