जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेतील काही कर्मचारी बुधवार, दि. ३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा महापौर दालनात दुपारी पावणेदोनच्या सुमारास महापालिका प्रशासनासह महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांच्या हस्ते रोपट्यासह कुंडी, शाल व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी निरामय आरोग्याच्या शुभेच्छाही दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचार्यांमध्ये सुनिल अनंतराव धुमाळ (सहाय्यक ग्रंथपाल), भिकन विष्णू पेंढारकर (वाहनचालक), योगेश युवराज पाटील (लिपिक-नगरसचिव विभाग), विजय संभाजीराव देशमुख (लिपिक-अतिक्रमण निर्मूलन विभाग), दिलीप प्रभाकर पाटील (मजूर) व दिनकर रामकृष्ण पाटील (शिपाई-महापौर कार्यालय) यांचा समावेश होता.
या छोटेखानी कार्यक्रमावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत व नगरसेविका काळे यांचे पती कुंदन काळे तसेच महापालिकेतील सहकारी वृंद व सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.