जळगाव (प्रतिनिधी) ‘सैय्यद अहमद शहीद रहे’ फाउंडेशन संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम सपंन्न झाला. यावेळी शकील अन्सारी I.R.S.(डेपुटी कमिशनर इन्कम टॅक्स) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुकीम खान यांच्या कुराण तीलावतने झाली. अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शकील अन्सारी यांचे स्वागत केले. रागिब शेख (संचालक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. तोसिफ खाटीक या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा परिचय करून दिला. यानंतर शकील अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना निरंतर प्रयत्न व सातत्य याचे महत्त्व पटवून दिले. हज हाऊस व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्रांची माहिती दिली. तसेच लोकसेवा व राज्य सेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. रागिब अहमद यांनी शकील अन्सारी यांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शेख तनवीर (डी आर एम ऑफिस) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.