जळगाव (प्रतिनिधी) जवखेडा येथील पुत्र संभाजी शिवाजी गोपाळ हे आर्मीमध्ये आपल्या देशाची १७ वर्ष सेवा झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त सोहळा जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सेवानिवृत्त कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संभाजी गोपाळ यांना शुभेच्छा दिल्या. सोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळगाव नगरसेवक मनोज चौधरी यांनी सत्कार केला. यावेळी जवखेडा येथील सरपंच रमेश पाटील, उपसरपंच धैरसिंग पाटील, ग्रा.पं.सदस्य आनंदसिग पाटील, सोनाबाई गोपाळ, आनंद गोपाळ आदी उपस्थित होते.