जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांचे दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचे दाखले सादर केले जातात. हा दाखला माहे नोव्हेंबर मध्ये घेतला जातो. पण कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकाना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. १८ सप्टेंबर, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये दि. ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सदर हयातीचा दाखला हा जीवन पोर्टल मार्फत सादर करणे, पूर्वीप्रमाणे बॅकेमार्फत कोषागारास हयातीचा दाखला सादर करणे, प्रत्यक्ष कोषागारात जावून हयातीचा दाखला सादर करणे, पोष्टव्दारे हयातीचा दाखला सादर करता येईल. तरी राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन प्र. सी. पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.