चोपडा (प्रतिनिधी) परतीच्या पावसाने अनेर परिसरातील घोडगाव कुसुंबा, विटनेर, वाळकी शेंदनी, मालखेडा गावांना अक्षरशः झोडपून काढले. परतीच्या पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील केळी बागांसह, कापूस, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिक जमीनदोस्त झाले आहेत.
शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झालेला परतीचा पाऊस व वादळामुळे अनेर परिसरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार अनिल गावित यांना दिले आहेत.
चोपडा तालुक्यातील अनेर परिसरात परतीच्या पावसाने घोडगाव, कुसुंबा, विटनेर, वाळकी शेंदनी, मालखेडा गावांना अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून, कापूस, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरी पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.आधीच कोरोनाने हवालदिल झालेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झाला आहे.यंदा अतिवृष्टीने मूग,उडीद वाया गेले.तर ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या अति पावसाने कापसाचा बहार धुतला गेल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने शेतकरी संकटात सापडला असतांना शुक्रवारी अचानक दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळासह मुसळधार पावसाने अनेर परिसराला तडाखा दिल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.कापणीवर आलेली केळी,ऊस,मका,सोयाबीन,ज्वारी,बाजरी शेतात जमीनदोस्त झाले आहेत.