अमळनेर (प्रतिनिधी) उभारी योजने अंतर्गत मौजे पिळोदा, पळासदळे व रामेश्वर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिवाळी निमित्त फराळ,कपड़े आणि रोख रक्कम मदत करण्यात आली आहे.
पिळोदा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी लोटन रामराव पवार व सुनिता लोटन पवार तसेच पळासदळे व रामेश्वर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिवाळीनिमित्त फराळ,कपड़े आणि रोख रक्कम नुकतीच मदत म्हणून देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे तसेच पालक अधिकारी तहसिलदार अमलनेर मिलिंदकुमार वाघ तसेच सोबत पी एस पाटील मंडळ अधिकारी नगांव बु, तलाठी हेड़ावे हर्षवर्धन मोरे उपस्थित होते.