पुणे (वृत्तसंस्था) राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे अधिकृत परिपत्रक आयोगाने शनिवारी काढले. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेला बसता येणार आहे.
म्हणजेच उमेदवारांसाठी वयोमर्यादेची गणती दिनांक 1 एप्रिल 2020 अशी राहील, असे लोकसेवा आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.