बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा त्वरित बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. तो त्वरीत मागे घेण्यात यावा, असे निवेदन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीतर्फे नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करीता देण्यात आलेल्या निवेदनात शालेय शिक्षण व क्रीडा विभागचे दि.19 सप्टेंबर22 रोजीचे पत्रानुसार शुन्य ते वीस पटसंख्या असलेले शाळा कायमचा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषतः मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील. कारण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभीर्याने विचार करावा. विद्यार्थी संख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकभरती करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात अशीही विनंती निवेदनात केली आहे.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष अनंत वाघ, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष दिपक खराटे ,पवन पाटील, तालुका संघटक गणेश सोनोने, शहराध्यक्ष शैलेश वराडे , मंगेश भोई ,गणेश मुलांडे ,सचिव प्रशांत सुरडकर, सुशीर इंगळे ,हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विधानसभा व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते यांना पाठवण्यात आल्या आहेत.