TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा आरोप ; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी आरटीओ खाते,बीएचआरमधील घोटाळे तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत वाचा फोडली आहे. गेल्या तीन महिन्यात तर खडसे यांनी जिल्ह्यात वेळोवेळी आंदाेलने करुन सरकारला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खडसे यांच्यासह परिवारातील व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला आला आहे. या प्रयत्नांना वेळीच आळा घालावा,अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे  यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून राज्याच्या राजकारणात व समाजसेवेत आहेत.त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपातील काही महत्वकांक्षी नेत्यांनी विविध गुन्ह्यात विविध प्रकारच्या तपास यंत्रणांना मागे लावून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. न्यायव्यवस्थेने त्यांना त्या अपयश दिल्याने ते हवालदिल झाले होते. परंतु, त्याच प्रवृत्ती परत राज्याच्या सत्तेत आल्याने त्यांनी पैशांचा व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून पुन्हा खडसे यांना राजकारणातून संपण्याचा डाव रचला आहे.खडसेंसारखा खमका विरोधक राजकारणातून संपवल्याशिवाय राज्यातील विविध निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सहकारी निवडणुकांमध्ये यश मिळवून सत्ता प्राप्त होणार नाही. असे लक्षात आल्याने व खडसे विधानपरिषद सभागृहात सत्ताधाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

READ ALSO

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

तसेच गेल्या तीन महिन्यात खडसे यांनी जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने करुन सरकारला उघडे पाडले. जिल्ह्यात चालणारे अवैध गुटखा, सट्टा, जुगार व वाळू उपसा तसेच घोटाळ्यांना वाचा फोडली. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे.सत्ताधाऱ्यांनी एखाद्या मोठ्या तथाकथीत फौजदारी गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिस अधिकारी खासगी स्वरुपात माहिती देत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन खडसे यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडवण्याचा कट रचण्यात आल्याचे कळत आहे. त्यासाठीच वेळोवेळी शासनाने पुरवलेल्या त्यांच्या विविध सुरक्षाही काढून घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या जीवीताला धोका पोहोचवण्याचा कटही केलेला असू शकतो. सत्ताप्राप्तीसाठी ते कोणत्याही थराला पोहोचू शकतात. त्यांच्या प्रयत्नांना वेळीच आळा घालावा. खडसेंवर कोणत्याही प्रकारचे खोटे व बिनबुडाचे आरोप व खोटे गुन्हे दाखल केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीतर्फे निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, संजय जाधव, मजहर पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
Next Post

उदयकुमार महाजन बीएएमएसची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : नऊ जणांनी केला तरुणाचा खून ; मृतदेह पुरला निर्जनस्थळी !

December 18, 2023

रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

September 21, 2021

जळगाव कोरोना कुटुंबपुनर्वसन समितीत सामाजिक संस्था-व्यक्तींनी सहभावी व्हावे : अँड. जमील देशपांडे

July 11, 2021

मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : हरीभाऊ राठोड

February 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group