मुंबई (वृत्तसंस्था) अंधेरी पूर्व पोटनिडणुकीत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. तिसऱ्या फेरीतही लटके आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीअखेर लटकेंना १२ हजार ९४ मतं मिळालेली आहेत.
तिसऱ्या फेरी अंती ऋतुजा लटके यांना दुसऱ्या फेरीच्या तुलनेत केवळ 4 मते अधिक मिळाली आहेत. तर, नोटाला तिसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीपेक्षा 1497 मते अधिक मिळाली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौथ्या फेरीचे निकाल जाहीर आले आहे. चौथ्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नोटा असून 3580 मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील बाळा नडर यांना 505 मतं मिळाली आहे. तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत ऋतुजा लटकेंची 257 मते घटली आहे.
पहिल्या फेरीत कोणाला किती मते?
पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे : श्रीमती ऋतुजा लटके- 4277, श्री बाला नाडार – 222, श्री.मनोज नाईक – 56, श्रीमती मीना खेडेकर- 138, श्रीमती फरहान सय्यद- 103, श्री.मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 आणि नोटा -622 एकूण मत : 5624
दुसऱ्या फेरीत कोणाला किती मते?
२ऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : श्रीमती ऋतुजा लटके- ७८१७, श्री बाला नाडार – ३३९, श्री.मनोज नाईक – ११३, श्रीमती मीना खेडेकर- १८५, श्रीमती फरहान सय्यद- १५४, श्री.मिलिंद कांबळे- १३६, राजेश त्रिपाठी- २२३ आणि नोटा -१४७०, एकूण मते : १०४३७
तिसऱ्या फेरीत कोणाला किती मते?
मते : श्रीमती ऋतुजा लटके- ११३६१, श्री बाला नाडार – ४३२, श्री.मनोज नाईक – २०७, श्रीमती मीना खेडेकर- २८१, श्रीमती फरहान सय्यद- २३२, श्री.मिलिंद कांबळे- २०२, राजेश त्रिपाठी- ४१० आणि नोटा -२९६७, एकूण मते : १६०९२