जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ख्रिश्चन लोकांचे समशान भूमी व रेल्वे पटरी जवळ रोडवर सार्वजनिक जागी एका व्यक्तीकडून मोबाईलसह रोकड लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात वाल्मीक उत्तम मोरे (वय ४३, रा. शिवाजीनगर वज्रेश्वरी मंदिराजवळ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ जून २०२२ रोजी रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील ख्रिश्चन लोकांचे समशान भूमी व रेल्वे पटरी जवळ रोडवर सार्वजनिक जागी कोणीतरी दोन अज्ञात इसमांनी वाल्मीक उत्तम मोरे यांच्या जवळील १ हजार ५०० रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाइल, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ हजार ५०० रुपये किंमतीचा माल बळजबरीने लुटून पळून गेले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहेत.