पाळधी (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी सलग तीन घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या–चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केल्याचे समजते.
अरमान सय्यद, सय्यद वायरमन आणि शाहरुख मणियार यांच्या घरांना चोरट्यांनी एकाच रात्री लक्ष्य केले. चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या–चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. पहाटे घरमालकांना घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
















