चोपडा (प्रतिनिधी) प्रताप विद्या मंदिर,चोपडा येथील माध्यमिक शिक्षक रोहन पाटील यांनी एन सी सी अधिकारी होण्यासाठीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न केले आहे. प्रशिक्षणानंतर त्यांची असोसिएट एन.सी.सी.अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ४५ दिवसांचे आर्मीचे कठोर प्रशिक्षण त्यांनी एन.सी.सी. अधिकारी प्रशिक्षण केंद्र कामठी,नागपूर येथून पूर्ण केले.
कठोर परिश्रम, शिस्त आणि वेळेचे काटेकोरपणे पालन व शारीरिक मेहनत करून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे तेथे त्यांना टी. ओ. (ए.एन. ओ.) ही रँक प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. ४९, महा. बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक तसेच संस्थेचे संस्थेच्या अध्यक्ष सौ .शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन श्री राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी,भूपेंद्र गुजराथी,मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक पी डी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील,श्रीमती एम डब्लु पाटील, ए एन भट,उपप्राचार्य जे एस शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हसभाई गुजराथी,तसेच डी टी महाजन यांच्यासह सर्व शिक्षक ,शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.