TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहेरच्या बांगड्यांच्या रुपाने मिळाली रोहिणीताई खडसेंना मायेची अनुभूती !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण व सेवाकारण यांच्या समन्वयातून साधले जाते ते राजकारण हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या खडसे परिवारातील राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना कुऱ्हा येथे मतदारसंघातील नागरिकांच्या मनात वसलेले खडसे परिवाराविषयी आस्था, प्रेम यांची अनुभूती मिळाली.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही मोजकेच नेते आहेत, ज्यांनी आपली सुरुवात शून्यातून केली. मात्र जिद्द, चिकाटी, अभ्यासपूर्ण वत्कृत्व यासोबतच आपल्या संपूर्ण मतदारसंघालाच कुटुंब मानून केलेला लोकसंग्रह. राजकारण तर बरेच जण करतात पण राजकारण हा समाजकारणाचा उत्तम मार्ग आहे आपल्या वृत्तीतूनच नव्हे तर कृतीतून दाखविणाऱ्या एकनाथराव खडसे यांनी गेले तीस वर्ष मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या तीस वर्षात त्यांनी सर्व जातीधर्माला सोबत घेऊन राजकारण, समाजकारण केले कोणी त्यांच्याकडे काही काम घेऊन आल्यास कोणताही पक्षीय किंवा इतर भेदभाव न करता प्रत्येकाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना सर्व मतदारसंघाला आपला परिवार मानुन कार्य केले प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा प्रयत्न केला संकटात गरिब श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाची मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पक्ष विस्तारासाठी शहर खेड्यापासून अगदी आदिवासी पाड्यापर्यंत गेले. झोपडीत बसून मिळेल ती चटणी भाकरी खाऊन राजकारण, समाजकारण केले म्हणूनच त्यांना लोकनेते म्हटले जाते.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

आ. एकनाथराव खडसे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा राजकीय सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे करताना दिसुन येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी पराभवाने खचुन न जाता त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात समाजकार्य सुरू केले. मतदारसंघातील आनंदाचा प्रसंग असो वा दुःखाचा त्या प्रत्येक ठिकाणी आवर्जून हजर असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणी काही अडचणी, समस्या घेऊन आल्यास त्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मतदारसंघात मोठ्या नेत्यांपासून अगदी वाड्या वस्तीवरच्या कार्यकर्त्यांसोबत आणि नागरिकांसोबत त्या सतत संपर्कात राहून त्यांची अडीअडचणी समस्या जाणून घेत असतात. त्यांच्यासोबत संवाद साधत असतात.

संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघाला आपले कुटुंब मानून कार्य करत असल्याने, मतदारसंघातसुद्धा प्रत्येक कुटुंबात त्यांना मुलीप्रमाणे प्रेम मिळते. याचा प्रत्यय काल (दि.१२) कुऱ्हा येथे आला. एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त रोहिणी खडसे या कुऱ्हा भागात असताना, बांगडी विक्रीचा व्यवसाय करणारे राजूभाऊ सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना हाक मारून आपल्या दुकानावर बोलवले. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तात्काळ आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून राजू सातपुते यांच्या दुकानाला भेट दिली.

यावेळी राजूभाऊ सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना त्यांच्या दुकानातील बांगड्या भरण्याचा आग्रह केला. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या विनंतीचा मान ठेऊन सातपुते यांच्याकडून आपल्या हातात बांगड्या भरून घेतल्या. राजूभाऊ सातपुते यांनी आपल्या मुलीप्रमाणे रोहिणी खडसे यांच्या हातात बांगड्या भरल्या. याक्षणी राजूभाऊंच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून उपस्थितांना जणू एक बापच आपल्या मुलीला बांगड्यांचा आहेर देत असल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. हा क्षण तेथे उपस्थित अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये छायाबद्ध केला.

रोहिणी खडसे यांनीसुद्धा आपल्या फेसबुक व इतर सोशल मिडिया माध्यमावर या प्रसंगाची पोस्ट केली असून त्यासुद्धा या प्रसंगातून गहिवरून आल्याचे दिसून येते. आपल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात, भारतीय संस्कृती मध्ये कंगण म्हणजेच बांगडीला सौभाग्याचे भुषण मानले जाते. माहेरी आलेल्या मुलीला बांगड्या भरण्याची आपली प्राचीन प्रथा आहे. तस मुक्ताईनगर हे माझे माहेर आणि सासर सुद्धा.. गेले चाळीस वर्षात आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला आपले कुटुंब मानूनच कार्य केले म्हणून मला तालुक्यात कुठेही गेले तरी आपल्या घरातील एक मुलगी म्हणूनच मान मिळतो. आज कार्यक्रमानिमित्त कुऱ्हा येथे गेली असताना तेथील बांगड्यांचे व्यावसायिक राजूभाऊ सातपुते यांनी आग्रहपूर्वक दुकानावर बोलावून माझ्या हातात बांगड्या भरल्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या स्वतः च्याच मुलीच्या हातात बांगड्या भरत असल्याचे समाधान होते. खरच हा एक सुखद अनुभव होता.

मतदारसंघात फिरत असताना अशा लहान मोठ्या कृतीतून गेली चाळीस वर्षात एकनाथराव खडसे यांनी माणसांचा जो गोतावळा जमा केला त्याचा पाऊलोपाऊली अनुभव येतो. यावरून रोहिणी खडसे यांचा आपल्या मतदारसंघात तळागाळातील लोकांपर्यंत असलेला जनसंपर्क आणि आस्था दिसून येते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

तमाशा लोककलेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध : शेषराव गोपाळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

November 15, 2021

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या !

August 12, 2021

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

July 9, 2024

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; बकाले आणि श्याम लोहींविरुद्ध कारवाईची मागणी !

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group