जळगाव, प्रतिनिधी : पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार सामाजिक कृतज्ञतेसाठी दिला जातो.
नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ७ मार्च रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटरचे संचालक रितेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी मंचावर निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील, महापौर हिमगौरी आडके-आहिर, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक, संतोष मराठे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील हे मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.















