चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध फेडरेशनचे संचालक रोहित निकम यांनी चोपडा येथे ज्येष्ठ नागरिक संघास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी रोहित निकम यांचे स्वागत केले. या वेळी रोहित निकम यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत व सभागृहाची पाहणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामकाजाची आत्मियतेने माहिती घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन संस्थेच्या उपक्रमांची जाणून माहिती घेतली. तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले.
या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष जिजाबाराव नेरपगारे, कोषाध्यक्ष दिलीप पाटील, सहसचिव विलास पाटील, कार्यकारिणी सदस्य श्याम गुजराथी, गोकुळ पाटील, परशुराम पेंढारकर, सुभाष पाटील, शांताराम पाटील, रितेश निकम, चंद्रशेखर पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.