कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) येथील नवनिर्वाचित सरपंच महेश पांडे, उपसरपंच डॉ. नाजीम शेख, ग्रामपंचायत सदस्य रुपेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अबू दादा, ग्रामपंचायत सदस्य अर्शद अली, ग्रामपंचायत सदस्य अशफाकअली ग्रामपंचायत सदस्य सद्दाम पिंजरी, ग्रामपंचायत सदस्य मुश्रीफ पठाण, पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश या संस्थेच्यावतीने मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार शिर्डी येथील भव्य दिव्य समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच यावेळी भारतीय पत्रकार महासंघ जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार दिपक शिंपी तथा रॉयल जिमचे संचालक शेख अतिक बिल्डर व रॉयल जिमचे सदस्य शेख भाऊ बिल्डर, कोशर बिल्डर, शोएब भाई, मान्नान बिल्डर, मुन्ना वाजीद, तोषिफ आदी उपस्थित होते.