अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बँक ऑफ बडोदा शाखा समोर लावलेली टीव्हीएस ज्युपीटर गाडीच्या डिक्कीत ठेवलेले ९० हजार रुपये चोरट्यांनी डिक्की उघडून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रभाकर भाईंदास पवार (वय ३७ रा. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि ३१.०३.२०२२ रोजी दुपारी १.४० ते ०१.५० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात दोन चोरट्याने अमळनेर शहरातील बँक ऑफ बडोदा शाखा समोर लावलेली माझी टीव्हीएस ज्युपीटर गाडी क्र. एम एच १९ डीजे ७९१७ हीचे डीक्कीत ठेवलेल ९० हजार रुपये रोख डीक्कीचे लॉक तोडुन चोरुन नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना कैलास पवार करीत आहेत.