नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात एका नवीन विषाणूने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. या विषाणूचे नाव आहे मंकीपॉक्स. दरम्यान एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT-PCR किट तयार केली आहे. या किटचा वापर करून रुग्णाला ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणजेच मंकीपॉक्सची लक्षणे आहेत की नाही हे कळेल.
भारतीय खाजगी आरोग्य उपकरण कंपनी ‘ट्रिविट्रॉन हेल्थकेअर’ने शुक्रवारी मंकीपॉक्स म्हणजेच आर्थोपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने सांगितलं आहे की, त्यांच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे.
ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे चार रंगी फ्लूरोसेन्स आधारित किट आहे. हे किट एकाच नळीमध्ये चेचक आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते. याचा अहवाल मिळण्यास एक तास लागतो असे कंपनीनं म्हटलं आहे. चार जनुक RT-PCR किटमध्ये प्रथम गट ऑर्थोपॉक्स गटातील व्हायरस शोधून दुसरा आणि तिसरा मंकीपॉक्स आणि चेचक विषाणू वेगळे करतो.