भंडारा (वृत्तसंस्था) नादुरुस्ती स्थितीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
आज (गुरूवार) सकाळी भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मोहघाट जंगल परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. रायपूर येथून प्रवाशांना घेऊन हंसा ट्रॅव्हल्स नागपूरला निघाली होती. भंडारा साकोली महामार्ग क्रमांक 6 मोहघाट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झालाय. ट्रॅव्हल्समधील अन्य प्रवाशी सुद्धा जखमी झाले. जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.