भुसावळ प्रतिनिधी । येथे मध्य रेल्वे प्रशासनाद्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांचे संचालन येत्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ज्या लोकांना किंवा व्यावसायिकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकड़े संपर्क करावा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -शालीमार पार्सल विशेष गाडी क्रमांक 00113 डाऊन पार्सल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. 31 डिसेंबरपर्यंत दररोज रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी ( 22:35 वाजता ) सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 11:35 वाजता शालीमार येथे पोहोचेल. गाडी 00114 पार्सल विशेष दि 31 डिसेंबरपर्यंत दररोज रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी ( 21.25 ) वाजता शालीमार येथून सुटेल आणि तिसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी 11.00 वाजता पोहोचेल. पुढील प्रमाणे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाशकुडा, मेचेदा. असे असणार आहे.