TheClearNews.Com
Monday, November 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल ; जाणून घ्या..आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवजवळ पोहचल्या आहेत. काही तासांमध्ये रशियन फौजा कीववर ताबा मिळवू शकतात, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येतेय. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार जवळपास ८०० रशियन सैन्य ठार झाले आहेत. युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनच्या १३७ जणांना प्राण गमवावे लागले.

आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी उपमंत्री हाना मल्यार यांचा हवाला देत 800 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला. एका अधिकृत ट्विटद्वारे मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनने 7 रशियन विमाने, हेलिकॉप्टर, 30 हून अधिक रणगाडे, 130 हून अधिक बीबीएम नष्ट केले आहेत.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये शुक्रवारी पहाटे दोन मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य राजधानीजवळ आले आहेत. रशियन फौजांनी नागरी वस्तींवर गोळीबार केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले. त्याशिवाय एअर डिफेन्स सिस्टिमने रशियाचे दोन घातक हल्ले परतवले असल्याचे म्हटले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील 11 एअरफील्डसह 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याची माहिती रशियाने दिली.
रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण उभं आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केली. त्यांनी संसदेत युक्रेनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुढील निर्बंधांनुसार, रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर ठेवले जाईल. ब्रिटनने यापूर्वी पाच रशियन बँका आणि पुतीन यांच्या तीन मित्र राष्ट्रांवर निर्बंध जाहीर केले होते.
रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे. चेर्नोबिल अणू प्रकल्प हा युक्रेनची राजधानी कीवपासून 130 किमी अंतरावर आहे. एप्रिल 1986 मध्ये मोठा स्फोट झाला होता. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, चेर्नोबिल अणू प्रकल्पात यावेळी युक्रेन आणि रशियातील अणू प्रकल्पाचा 22 हजार गोणी अणू कचरा ठेवण्यात आला आहे.
बायडन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेकडून रशियावर निर्यात निर्बंधही लादण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या निर्बंधांचा मोठा फटका रशियाला बसेल, असंही बायडन म्हणाले. सोबतच रशियातील उद्योगपती आणि अब्जाधीशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आर्थिक कोंडी करणार असल्याचा सूचक इशाराही जो बायडन यांनी दिला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. या दोन नेत्यामध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटांची चर्चा झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Russia_Ukraine_Crisis

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

अमरावती : विवाहबाह्य संबंध अन् दोघांनी गमावला जीव ; हत्याकांड घडविणारा तिसरा कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 27, 2025

संत सावता महाराजांची जन्मभूमी ‘अरण’ पुण्यभूमीला शासनाने ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा : पी.डी.पाटील !

July 27, 2022

धरणगावात मुद्रांक विक्रेत्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन !

October 31, 2023

दारूच्या नशेत वेटरला शिवीगाळ करून सुरीने वार !

February 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group