जळगाव (सुरेश उज्जैनवाल) माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील परंतू उत्तम गुणवत्ता असलेल्या गुणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी एसडी-सीड ही दीर्घकालीन योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा 15 वा शिष्यवृत्ती सोहळा शनिवारी (ता.19नोव्हे.) समारंभकपूर्वक होत आहे. गेल्या दिड दशकांपासून ही दातृत्वायाची सेवा अखंडितपणे सुरू आहे. या समारंभाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा….!
सुरेशदादा जैन हे राजकारणातील ख्यातनाम वादळी व्यक्तिमत्त्व, त्याच बरोबर दिलदार मनाचे दानशूर व्यक्ती म्हणून ही त्यांची महती राज्यभरात आहे. राजकीय क्षेत्रात ते तूर्त कार्यरत नसले तरी सामाजिक सेवेचं व्रत त्यांनी कायम राखले आहे. जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही समाजाच्या, धर्म पंथाच्या होतकरू गुणी विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये म्हणून त्यांनी आपल्या मातोश्री प्रेमा बाई जैन याच्या नावाने सुरू केलेली उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना अखंडितपणे गेल्या पंधरा वर्षां पासून सुरू आहे. एखादी सार्वजनिक सेवा , योजना जिल्हास्तरावर सातत्याने अखंडितपणे राबविणे ही काही सामान्य बाब नाही, समाजाचा नि:स्वार्थ कळवळा असल्या शिवाय शक्य नाही. राजकीय क्षेत्रात अश्या स्वरूपाचं विधायक कार्य व्यक्तिगत पातळीवर करण्या चे हे अतिशय दुर्लभ उदाहरण म्हणता येईल. दातृत्व वृत्ती च्या या पंधरा वर्षाच्या दीर्घ प्रवासात काही प्रसंगी अडचणी आल्या तरी विद्यार्थ्यांना मदत करण्याचं हे कधीही थांबलं नाही, हे विशेष. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया अत्यन्त गरजे ची वाटचाल किंवा परंपरा खंडित होऊ नये याची काळजी ही दादांनी घेतल्याचे अनुभवास येते . अगदी आजारी असताना आणि मुंबईच्या रुग्णालयात अंथरूणावर असताना सन 2012-13मध्ये देखील त्यांनी शिष्यवृत्ती योजने चे काम पहाणाऱ्या विश्वस्थ मंडळाला योजना सुरूच ठेवण्याचं संदेश दिला आणि तो अमलात ही आणला गेला. अशी सामाजिक बांधिलकी जोपासणे असामान्य व्यक्तिमत्वा शिवाय शक्य नाही.
हजारो गरजू विद्यार्थ्याना प्रत्यक्षात लाभ
जिल्ह्यातील होतकरू गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशां अभावी थांबू नये, त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करावे, जेणे करून खऱ्या अर्थांने व्यक्ती, समाज व राष्ट्राचा समग्र विकास घडून येईल या उदात्त हेतूने दादांनी सन 2008 पासून शैक्षणिक उद्योजक विकास ही योजना सुरू केली. दहावी ते उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा त्या मागचा हेतू होता आणि आहे. आता पर्यंत 14000 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घेतला आहे, त्यातील सुमारे 4000 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता आले आहे.
शिस्तबद्ध , अभ्यासू कार्यकारी मंडळ
एसडी-सीड या योजनेचं वैशिष्ठ्य म्हणजे योजना राबविणारे कार्यकारी मंडळ अत्यन्त अभ्यासू जाणकार आणि शिस्तबद्ध निस्वार्थ वृत्तीने काम करीत आहेत. दादांच्या कन्या मीनाक्षी ताई जैन, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, प्रा.एस.एस.राणे, महेश गोराडे, नंदलाल गादीया, सागर पगरिया, डॉ. सुरेश अलिझाड, राजेश यावलकर आदि या सह प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी अशी जवळपास 35 जणांची टीम काम करीत आहे. सामाजीक दातृत्वाची ही परंपरा अशीच सुरू राहो, हीच शुभेच्छा…