पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील जनता वसाहत भागातील रहिवासी व मुक्ताईनगर एस.टी. आगारातील वाहक चंद्रकांत हरिश्चंद्र ब्राह्मणे (४७) यांचे दि. ४ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला.
पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील रहिवासी चंद्रकांत हरिश्चंद्र ब्राह्मणे हे मुक्ताईनगर एस.टी. आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका सर्पाने दंश केला. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रकांत ब्राह्मणे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास पोनि राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार गोपाल जाधव हे करत आहेत.