मुंबई प्रतिनिधी । प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एमजीएम रुग्णालयाने सांगितले. कोरोना झाल्याने त्यांना (दि.५ ऑगस्ट) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती खूपच ढासळल्याचे रुग्णालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. अनुराधा बास्करन यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीवर तज्ञांचे पथक लक्ष ठेवून आहे.
एस पी बालसुब्रमण्यम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा खुद्द बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताप आणि खोकला असल्याचे सांगितले. तसेच आपल्या फॅन्सनी फार काळजी करू नये असे आवाहन केले होते. लवकरच आपण बरे होऊन परत येऊ असे बालसुब्रमण्यम म्हणाले होते. चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण गुरूवारी डॉक्टरांनी एक मेडिकल बुलेटिन जारी केले. त्यानुसार बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. बालसुब्रमण्यम यांनी तमिळ, तेलुगु, कानडी, हिंदी आणि मल्यासळम सहित 16 भाषांमध्ये 40 हजारहून अधिक गाणी गायीली आहेत. 90 च्या दशकात सलमानच्या चित्रपटात बालसुब्रमण्यम यांचा आवाज असायचाच. बालसुब्रमण्यम यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.