चोपडा (प्रतिनिधी) वाघळी ता चाळीसगाव येथील प्रगतिशील शेतकरी सच्चीदानंद यशवंत सूर्यवंशी यांना जळगाव येथे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. शरीफ बागवान व मान्यवर उपस्थित होते. सूर्यवंशी यांचे विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.