रावेर (प्रतिनिधी) रावेर काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या लोकसभा अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे सद्दामशाह खलीलशाह यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी यावल रावेरचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी, जि.प. गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, काँग्रेसचे जेष्ठ नेते हाजी शब्बीर शेठ, शेतकी संघाचे चेअरमन सुनील फिरके, युवानेते धनंजय चौधरी, युवानेते वढोड्याचे सरपंच संदीपभैय्या सोनवणे, जिल्हाध्यक्ष जलील पटेल, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, जिल्हामीडिया प्रमुख तथा सरपंच कोरपावली विलास अडकमोल आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.