अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी तालुका अमळनेर येथे संत सावता माळी पुण्यतिथी कोरोनाचे नियमांचे पालन करून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
देवगाव देवळी येथे दुपारी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक पाटील यांनी सपत्नीक केले. गावात संत सावता महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी संपूर्ण गावाला सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व उपसरपंच संदीप जगन्नाथ शिंदे यांनी स्वखर्चातून जेवणाचा कार्यक्रम केला. संत सावता महाराज यांच्या यांच्या भक्तीने वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सुभाष बैसाणे, कल्पनाबाई चंद्रभान माळी, मंदा चंद्रकांत माळी, आनंद नगराज भिल, अनिता छोटू मोरे, वैशाली निलेश माळी, गोपाल सुदाम माळी यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवलदादा पाटील, धर्मराज पाटील, माधवराव पाटील, शंकर बैसाणे, दंगल लालचंद मोरे, उखर्डु बैसाणे, राजाराम बंडू बैसाणे, विश्वास पाटील, पिरन निकम, आनंदा पाटील, नाना दयाराम पाटील, पोलीसपाटील अविनाश बैसाने, छोटू मोरे, पुंडलिक छबिलाल पाटील, दिनेश गंजीधर पाटील, गोविंद शिंदे, भटू त्र्यंबक पाटील, सुभाष सखाराम पाटील, दिपाली प्रवीण पाटील, गिताबाई रवींद्र पाटील, सुरेखा शिवाजी पाटील, रेखाबाई संभाजी पाटील, सुनंदा तानाजी पाटील सह गावातील ग्रामस्थ मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.