धरणगाव (प्रतिनिधी) थोर क्रांतीकारक वि.दा. सावरकर यांच्या जयंती निमित्त आज शिवसेना (ऊबाठा) आणि समस्त ब्राह्मण समाजाकडून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आज शहरात शिवसेना (ऊबाठा) आणि समस्त ब्राह्मण समाजतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त शिवसेना कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक भागवत चौधरी, अॅड. शरद माळी ,जळगाव जनता बँकेचे गौरव वैद्य आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष ललित उपासनी यांनी सावरकरांच्या प्रतीमेची विधिवत पूजा करत पुष्पहार अर्पण केला. नंतर कान्यकुब्ज ब्राह्मण संघाचे अध्यक्ष पंडित विजयकुमार शुक्ला यांच्यासह शिवसेनेचे आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघाचे पदाधिकाऱ्यांनी एक-एक करून वीर सावरकर यांच्या प्रतीमेला अभिवादन केले.
शेवटी कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आणि पत्रकार पंडित विजयकुमार शुक्ला यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू राष्ट्रवादाचे जनक होते. तसेच राजकीय विचारधारा ‘हिंदुत्व’ला विकसित करण्याचे सर्वात मोठे श्रेय फक्त आणि फक्त वीर सवरकर यांनाच जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण अग्निहोत्री यांनी तर ललित उपासनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी ब्राह्मण समाजाचे गौरव वैद्य, पंडित विजयकुमार शुक्ला,डॉ प्रशांत भावे, ललित उपासनी, सागर भावे, प्रसन्ना भावे, श्रीकांत भावे, शुभम जोशी, किरण अग्निहोत्री तसेच शिवसेना (ऊबाठा) चे शहर प्रमुख भागवत चौधरी, अॅड. शरद माळी, सचिन पाटील, राजेंद्र ठाकरे, परमेश्वर महाजन, सचिन चव्हाण, बापू चावदस, संजय दाभाड़े, गणेश महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी “स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे ” चा जयघोष करण्यात आला.